15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

तळेरे बस स्थानक सर्व सोयींनी अद्यावत करा

सरपंच व ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली मागणी

कणकवली | मयुर ठाकूर : तळेरे बस स्थानक हे महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेले मुख्य बस स्थानक आहे याच ठिकाणी एसटीच्या असंख्य गाड्या थांबतात. स्थानिकी प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते त्यामुळे तळलेले बस स्थानक सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असावे. प्रवाशांना भासणार्‍या गैरसोयी दूर व्हाव्यात यासाठी तरळे ग्रामपंचायतच्या वतीने आमदार नितेश राणे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली आहे
तळेरे येथील बसस्थानक सर्व प्रवासी सोई – सुविधांनी युक्त व अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तो शासकीय निधी उपलब्ध होणेबाबत तळेरे ग्रामपंचायत मार्फत सरपंच श्री. हनुमंत तळेकर यांच्या वतीने प्रस्ताव भाजपा ग्रामीण मंडल कणकवलीचे अध्यक्ष श्री. दिलीप तळेकर यांच्या माध्यमातून आमदार श्री. नितेश राणे तसेच विभाग नियंत्रक, रा. प. म. कणकवली यांना सादर करण्यात आला. यावेळी भाजपा ग्रामीण मंडल कणकवलीचे उपाध्यक्ष श्री. राजेश जाधव, माजी उपसरपंच श्री. दिनेश मुद्रस, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच तथा भाजपा बुथ अध्यक्ष श्री. शैलेश सुर्वे, भाजप युवा मोर्चा कणकवली उपाध्यक्ष कु. चिन्मय तळेकर इ. उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!