8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी काहीच केले नाही

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम महायुती सरकार करत आहे

  मेहुण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री 2 ठाकरे दिल्लीत जात असत 

पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासात नाव कोरले 

कणकवली : मराठी भाषा महान च आहे. म्हणूनच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सगळी स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्ण करत आहे. जे त्यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांना केंद्रात सत्तेत राहून आणि राज्यात मुख्यमंत्री असतानाही जमलं नाही. ते आमच्या महायुती सरकारने करुन दाखवल आहे. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते.

आमदार नितेश राणे म्हणाले, मोदी साहेब आणि शिंदे – फडणवीस साहेबांचे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यास इतिहासात नाव कोरले गेले आहे. गेल्या अडीच वर्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले असेच काम आमच्या महायुती सरकारने केलेले आहे. यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नव्याने नामांकन केले., राम मंदिर उभारले, 370 कलम हटवले आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यामुळे आमच्या सरकारचे कौतुकच केले पाहिजे. शिंदे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना आता कळले असेल की मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी या नेत्यांनी ज्या पद्धतीने ही मागणी लावून धरली होती त्याला हे यश मिळाले आहे. त्यामुळे मोदी आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो असे आमदार नितेश राणे यांनी केले.

काही संजय राऊत सारखे डोमकावळे आम्ही मागणी केली होती असं बोलायला पुढे आलेले आहेत.त्यांना दुसऱ्याच्या बारशाला जाऊन नाचण्याची सवय झाली आहे .राऊत आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे हे अशाच वृत्तीचे आहेत.2014 ते 1019 पर्यंत सत्तेत होते तेव्हा आपल्या मेहुण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री 2 साठी जेवढा आग्रह धरला तेवढा मराठी भाषेसाठी कधीच धरला नाही. मात्र आज पर्यंत कुठल्याही पंतप्रधाना जमलं नाही ते मोदींनी करुन दाखवलं असेही ते म्हणले. ठाकरे,राऊत यांना थोडी जरी लाज असेल तर मोदी, शिंदे, फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत. डोमकावळ्यांना चांगल्याला चांगल म्हणायची सवय नाही तसे संस्कार नाही असेही आमदार नितेश राणे यांनी सुनावले.

मराठी माणूस व नोकरीं ह्यावर संजय राऊत ने कमी बोलावं असा माझा सल्ला आहे. कारण पत्राचाळ मध्ये मराठी माणूस राहत होते. येथे पाकिस्तान मधून आलेले नाहीत त्यांना तू फसविले आहे.त्यामुळे तोंड उघडताना विचार कर असे बजावले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!