नृत्य क्षेत्रातील गेल्या २० वर्षातील भरीव कामगिरीची दखल
मसुरे : नृत्य क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शासनमान्य असलेली ‘चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ’ या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपूत्र पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या नृत्य कार्यक्रम आयोजक व नियोजक प्रमुख, नृत्य परीक्षक, नृत्य विश्लेषण आदी नृत्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांचा सुप्रसिद्ध रंगकर्मी तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ठाकूर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला अवार्ड शो म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण सोहळा मराठा समाज हॉल कुडाळ येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांसह रंगकर्मी केदार सामंत, केदार देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, अनंत जामसंडेकर, श्री नाईक, श्री पावसकर, चिमणी पाखरचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष श्री रवि कुडाळकर,सुहास वरूणकर, राजा सामंत, वर्षा वैद्य, आदी मान्यवर उपस्थित होते.
मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर हे नृत्य क्षेत्रात मागील 20 वर्षाहून अधीक काळ कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातही ते नेहमी अग्रणी असतात. चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ या संस्थेच्या वतीने नृत्य सन्मान विशेष पुरस्कार 2024 पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्यावर मुंबई, मालवण तालुक्यातून आणि मसुरे गावातून आणि पत्रकार शेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.