17.9 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध | आ. नितेश राणे

 सामंत यांची भेट ही कौटुंबिक ; राजकीय चष्म्यातून पाहू नका

कणकवली | मयुर ठाकूर : सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. किरणजी सामंत, आणि मंत्री उदयजी सामान हे केद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मानतात. मानसन्मान देतात. राजकीय सल्ले घेतात. अशावेळी उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री राणे साहेब यांच्यात भेट झाली तर ती कौटुंबिक भेट असते. अधिकार वानीने घेतलेली भेट असते. अशा व्यक्तीला राजकीय चष्म्यातून पाहू नये. जसे निलेश आणि नितेश आहेत तसेच राणे साहेबांसाठी किरण जी आणि उदय जी आहेत. त्यामुळे मंत्री उदयजी सामंत यांची भेट ही अधिकार वानिणे घेतलेली कौटुंबिक भेट होती. असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले. किरण सामान हे खूप सरळ आणि साधेपणा अंगीकारलेला माणूस आहे. ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेऊन जशी केंद्रीय मंत्री राणे साहेबांची त्यांना साथ आहे. तशीच त्यांच्या पुढील राजकारणा साठी माझी आणि निलेश राणे यांची संपूर्णता साथ राहील. कुठेही आणि कोणीही त्यांना एकट पाडू शकणार नाही. याची मी शाश्वती देतो. किरण सामंत एकटे नाहीत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. एकत्र मिळून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार आहोत.अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.

व्यंकटेश उप्पर हा हेरगिरी करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्यावर नेमलेला माणूस होता. आठ महिन्याची शिक्षा लागल्यानंतर जामिनावर बाहेर पडून आलेला हा वेंकटेश उप्पर आता बेपत्ता झालेला आहे.सपना पाटकर यांनी या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून मनसुख हीरोइन, सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रमाणे व्यंकटेश उप्पर याची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केलेला आहे. आणि या प्रकरणात खासदार संजय राजाराम राऊत याचेवर आरोप केला आहे. जर संजय राजाराम राऊत यांचे खुणाने हात बरबटलेले नसतील तर व्यंकटेश उप्पर हा कोठे आहे याचा खुलासा करावा. किंवा उद्या सकाळच्या पत्रकार परिषदेत स्वतःच्या बाजूला बसून व्यंकटेश उप्पर जिवंत असल्याचा पुरावा द्यावा. असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

श्री नितेश राणे म्हणाले, ओसाड गावचे पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे तीन तेरा वाजवणारा भांडुपचा देवानंद संजय राऊत आहे.त्यांची मोदींवर टीका करण्याची लायकी नाही.ज्याच्या कुटुंब व मालक कोविड भ्रष्टाचार आणि खिचडी चोरी प्रकरणात असणारे कधीही जेल मध्ये जाऊ शकतात महाराष्ट्रात केजरीवाल भाग 2 कधीही प्रदर्शित होऊ शकतो. असा इशारा दिला. मोदींवर एक भ्रष्टाचाराचा आरोप मागील 10 वर्षात हे करू शकले नाहीत. मात्र यांनी कोरोणात भ्रष्टाचार केला.खिचडी खाल्ली,खुणांनी ह्यांचे हात बरबटलेले आहेत. अशी टीका केली. राणे साहेबांनी सिंधुदुर्ग मध्ये काय दिलं ह्याचा हिशोब हवा असेल तर एका खुल्या व्यासपीठावर या.किती विकास कामे अडविण्याचे काम ह्या विनायक राऊत ने केले आहे. त्याची चर्चा करू असे आव्हान दिले. या विनायक राऊतच्या खडा बैठकांना सात लोक सुद्धा नसतात ही यांची लायकी. गांधी व उद्धव ठाकरे कुटुंब दुसऱ्यांच्या पैशांवर जगणारे कुटुंब आहेत. ते कोणाच्या पैशाने फिरतात ? त्यांच्या नावे नाही नाही मग गाड्या, बंगले, विमाने कशी येतात. असे लोक मोदी साहेबांचे नाव घेण्याची ह्यांची लायकी नाही. वैभव नाईक यांचा हा धंदा आहे. त्यांनी राणेंच नाव घेतलं नाही तर मातोश्रीचा पगार मिळणार नाही. कुडाळ मध्ये मिळणारी लीड हे वैभव नाईक यांना उत्तर मिळेल.तर संजय राऊत ने उदय सामंत च्या भावाची चिंता करण्यापेक्षा त्याचा भाऊ नंदनवन मध्ये म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर किती वेळ असतो हे बघावं.तूम्हि नसल्यामुळे आम्ही टेंशन फ्री आहोत. तुमच्या सारखे खुनी बलात्कारी गॅंग रेप चा आरोप असणाऱ्यांनी भाजपावर बोलू नये.असे उत्तर आदित्य ठाकरे यांना आ. नितेश राणे यांनी दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!