9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

युवासेना आयोजित गणेश सजावट रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

कणकवली विधानसभेतून १३० स्पर्धक झाले होते सहभागी

विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या झाले बक्षीस वितरण

कणकवली | मयुर ठाकूर : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघात घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आताच्या युवा पिढीसाठी एक वेगळी संकल्पना सुशांत नाईक यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या स्पर्धेमध्ये कणकवली विधानसभेतून 130 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आज विजयभवन येथे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

 

यामध्ये कणकवली विधानसभेतुन श्री.अमित बाळकृष्ण गायकवाड मु.पो.कासार्डे ता.कणकवली – देखावा – कोकण संस्कृती यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. द्वितीय पारितोषिक श्री.सुरेश शंकर कळसुळकर (मु.पो. कळसुली ता.कणकवली ) देखावा- रायगड किल्ला यांना रोख रक्कम 5,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. तृतीय पारितोषिक श्री.रितेश दत्ताराम देवळेकर (मु.पो.पुरळ ता.देवगड ) देखावा – सोन्याची जेजुरी यांना रोख रक्कम 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कणकवली तालुक्यातून प्रथम श्री.सर्वेश संजय राणे (मु.पो.फौजदारवाडी ता.कणकवली ) देखावा – वारली संस्कृती यांना रोख रक्कम 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. देवगड तालुका प्रथम श्री.संजय गणपत तारकर (मु.पो.जामसंडे ता.देवगड )देखावा – संत गोरा कुंभार यांना 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. वैभववाडी तालुका प्रथम श्री.किरण मारुती दबडे. (मु.पो.इस्वलकर नाधवडे ता.वैभववाडी ) देखावा – साई पालखी देखावा यांना रोख रक्कम 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. तसेच सर्वोत्तम जास्त लाइक्स श्री. राजेंद्र रावले (मु.पो. गावडेवाडी ता.कणकवली ) यांना 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, सचिन आचरेकर, किरण वर्दम आदी स्पर्धेत सहभागी झालेल स्पर्धक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!