9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

कणकवली सांडवेमार्गे बुधवळे बसफेरी बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल

३ ऑक्टोबर रोजी कणकवली बस स्थानकामध्ये आंदोलनाचा इशारा

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली सांडवेमार्गे बुधवळे ही ३.४५ वा. सुटणारी शालेय बसफेरी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नियमित सुरू करण्यात आली होती. परंतु सदर बसफेरी सध्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे ही बसफेरी नियमित सुरू होण्यासाठी सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सरपंच ३ ऑक्टोबर रोजी कणकवली बस स्थानकामध्ये आंदोलनासाठी बसणार आहोत, असे निवेदन कणकवली आगार व्यवस्थापक यांना सांडवे हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी दिले आहे .

बसफेरी पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष पत्रव्यवहार केलेला होता. तसेच या संदर्भात आपली प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे. परंतु याबाबत आपण अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे ही बसफेरी नियमित सुरू होणे आवश्यक आहे असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!