उत्साहात आज लोकार्पण ; कॉंग्रेस खासदारांच्या फंडातून २२ लाखाचा निधी
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे खासदार डॉ. कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दंत चिकित्सालासाठी उपलब्ध झालेल्या मशिनरींचे आज लोकार्पण करण्यात आले. हा विभाग आता अत्याधुनिक झाल्यामुळे त्याचा फायदा आता सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख साईनाथ चव्हाण, नागेश मोर्ये, अभय शिरसाट, प्रकाश जैतापकर ,एकनाथ धुरी, प्रकाश डीचोलकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.