14.2 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

कलमठ गावातील शैक्षणिक आणि आरोग्य विकासावर भर – सरपंच संदिप मेस्त्री

शासनाच्या गृह व विधी न्याय मंत्रालय सामुदायिक आरोग्य शिबिर कार्यक्रम अंतर्गत उपक्रमाचे आयोजन

गावातील १३९ जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

कणकवली : कलमठ ग्रामपंचायत मध्ये श्री देव काशिकलेश्र्वर सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, नेफ्रोलोजी, दंतरोग, अस्थी रोग, स्त्रीरोग अश्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांमर्फत करण्यात आल्या. तसेच लघवी ,रक्त,थायरॉईड,मधुमेह, इसिजी व कर्करोग इतर तपासण्या देखील करण्यात आल्या.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विधी व न्याय विभागाच्या सामुदायिक आरोग्य शिबीर कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत कलमठ व लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे चा संयुक्त विद्यमाने कलमठ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये कलमठ गावातील १३९ जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी डॉ प्रकाश घोगळे, डॉ योगेश केंद्रे, डॉ संजय जोशी, डॉक्टर ऐश्वर्या जगताप, डॉ निलेश मेत्रे या तज्ञ डॉक्टरानी तपासणी घेतली. १५ व्या वित्त आयोगातून गावातील प्रत्येक घटकाला न्याय देत असताना आपण नेहमी शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा दर्जा चांगला रहावा यासाठी प्रयत्न केले त्याचाच एक भाग म्हणून हे आरोग्य शिबिर आहे सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले. उपस्थित डॉक्टर आणि सहकाऱ्यांचे स्वागत संदिप मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी केले.यावेळी उपसरंच स्वप्निल चिंदरकर दिनेश गोठणकर, नितीन पवार ,सुप्रिया मेस्त्री, श्रेयस चिंदरकर ,स्वाती नारकर,इफत शेख ,विकास लुडबे, विष्णू गोसावी, रितेश घाडीगावकर,तेजस लोकरे, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, स्वाती सावंत, भावना चिंदरकर, मनीषा परब, अमजद शेख, शर्वरी जाधव,पूर्वा धुरी, क्षितिजा कदम, विभावरी कांबळे,ज्योत्स्ना गुडेकर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!