कणकवली : तालुक्यातील शिवडाव साई मंदिर घाटीत रविवारी रात्री ९:३० वा. च्या सुमारास शेखर सावंत यांच्या क्रेशर वरून खडी वाहतुक करणारा डंपर साई मंदिर येथील उतारावर चार चाकी गाडीला बाजू देत असताना डांबरी रस्ता खचल्यामुळे डंपर डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित झाली नाही. मात्र गोव्याकडे खडी घेऊन जात असल्याने डंपर मधील खडी या घाटीच्या उतारावर झाडांमध्ये कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.