16.4 C
New York
Monday, October 20, 2025

Buy now

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद गावडे

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र श्री. गावडे यांना देण्यात आले.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे व शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी ही नियुक्ती केली. कामगार चळवळीतील आक्रमक व अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून जिल्ह्यात शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढे येणारा आवाज अशी त्यांची ओळख असून मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी याआधी केले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी फळी संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगव्या प्रवाहात जोडण्याचा मानस प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी युवासेना कणकवली विधानसभा जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, शिवसेना प्रवक्ते मंगेश गुरव, मनसेचे माजी ठेकेदार संघटना जिल्हाप्रमुख अमोल जंगले आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!