कणकवली : जय मल्हार मित्रमंडळ असलदे धनगरवाडी यांच्यावतीने तंटामुक्त अध्यक्ष रुपेश खरात यांचा शाल , श्रीफळ , पुच्छपगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी असलदे गावातील निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटवण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
शासनाच्या धोरणानुसार शांतता प्रस्तापित करण्याच्या दृष्टीने गावाचे सरपंच चंद्रकांत डामरे व सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समितीला विश्वासात घेवून काम करणार असल्याचे नुतन तंटामुक्त समिती अध्यक्ष रुपेश खरात यांनी सांगितले.
यावेळी जय मल्हार मित्रमंडळ असलदे धनगरवाडीचे विजय खरात, जानू खरात ,अविराज वरक, विराज वरक , प्रवीण खरात, प्रकाश खरात, संतोष खरात, सोनू खरात, विठ्ठल खरात ,शामू खरात ,सिताराम खरात, तुकाराम खरात ,दीपक खरात, धुळाजी खरात, शामू खरात, रवींद्र खरात ,अनिल खरात, सारिका खरात, दीक्षिता कोकरे , दशरथ कोकरे , सुवर्णा खरात, सुनंदा खरात ,सरीता खरात आणि वाडीतील लहान मोठे सर्वच सदस्य उपस्थित होते. यावेळी पारंपारिक लोककला धनगरीनृत्य सादर करत धनगरवाडीतील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.