मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेची माहिती देण्यात आली. जिल्हा संसाधन समन्वयक श्री. योगेश वालावलकर आणि तालुका समन्वयक श्री. कृष्णा साळसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदरच्या कार्यक्रमास कृषी विभाग मालवण चे तालुका कृषी अधिकारी श्री. एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी श्री. चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री. आंबर्डेकर, कृषी पर्यवेक्षक श्री. चव्हाण. कृषी सहाय्यक श्री. सौंगडे, कृषी सहाय्यक श्री. पातडे,मालवण पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री. संजय गोसावी, विस्तार अधिकारी श्री. गायकवाड, तसेच HDFC बँकेचे क्लस्टर हेड श्री. धाकतोडे, श्री. प्रसाद आहेर, श्रीम. अपूर्वा म्हापरले, ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर, तसेच ग्रा.पं. कर्मचारी श्रीम. करुणा राणे, श्री. बाळाराम परब, श्री. दत्ताराम परब, श्रीम. कोमल मांजरेकर, ग्राम रोजगार सेवक श्री. रामकृष्ण नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय पाताडे, आणि गावातील सुमारे 200 शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.