कुडाळ : तालुक्यातील भाजपा चे ज्येष्ठ नेते दादा बेळणेकर व भाजपा कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश (भाई) बेळणेकर यांच्या वाडोस येथिल निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सांत्वन पर भेट दिली. काही दिवसापूर्वी दादा बेळणेकर यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते.
आज जिल्हा दौऱ्यावर असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी बेळणेकर कुटुंबियांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा कुडाळ तालुका सरचिटणीस भाई बेळणेकर यांनी विविध विकासात्मक विषयावर चर्चा देखील केली. यावेळी भाजपा चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजपा पदाधिकारी तसेंच कार्यकर्ते उपस्थित होते.