मालवण : मालवण शहारात बसस्थानक समोर एका लॅब मधील कर्मचारी महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर भाजलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिलेल्या माहिती नुसार ( सौभाग्यश्वरी गोवेकर वय ३५ ) असे तीचे नाव असून तिला पहिल्या पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. जखमी हिस ओरोस येथे उपचारासाठी हलविले आहे. तिच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वत्र हळहळ व्यत केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास व आरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.