माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून पाहणी
कणकवली : सोमवारी सायंकाळी झालेलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे गांधीनगर (खलांतर) येथील शेतकऱ्यांचे राहत्या घरांतुन पडवी मधील संसार उपयोगी भांडी वाहून गेल्याने व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी गेल्याने गढूळ झाले तसेच भात पिकाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. असा पाऊस आपण कधीच पहिला नाही असे येथील जेष्ठ ग्रामस्थ सांगत होते. पाण्याच्या फुगीमुळे ओहोळा लगत च्या घरांच्या अंगणात व मागील बाजूस पडवीत पाणी घुसल्याने कृष्णा मेस्त्री सुतारवाडी व संभाजी सुरबा सावंत होवळे वाडी यांची संसार उपयोगी भांडी तर दयानंद लवू सावंत व श्रीमती सुनीता अनाजी सावंत वरचीवाडी यांच्या घराला पाणी लागल्याने सगळा चिखल माती त्यांच्या घराला येऊन लागली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांची भात पिकाची मोठी हानी झाली आहे झालेल्या नुकसानीची माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी पाहणी केली. तसेच गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे उपसरपंच राजेंद्र सावंत ग्रामसेवक वर्दम, तलाठी समृद्धी गवस यांनीही झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.