10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला राज्यस्तरीय नेत्यांचा सिंधुदुर्ग दौरा

महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांचे आवाहन

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी विधानसभा निहाय दौरा जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या व जिल्हासंघटक जान्हवी सावंत, रत्नागिरी संपर्क संघटक वर्षाताई पितळे, माजी नगरसेविका आणि निरीक्षक अनिता बागवे, माजी नगरसेविका आणि निरीक्षक पूजा महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभाग विधानसभा निहाय आढावा बैठकीचे आयोजन कणकवली विजय भवन येथे मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आयोजन केले आहे. या बैठकीसाठी कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील उपजिल्हा संघटक, तालुका संघटक, तालुका समन्वयक, उप तालुका संघटक, शहर संघटक उपशहर संघटक, शहर शाखासंघटक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेविका, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक, बूथ प्रमुख यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!