24.5 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भंडारी हायस्कुलचा १७ वर्षाखालील मुलींचा संघ विजयी…!

मालवण : ओरोस येथील जिल्हा क्रिडा संकुल मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या १७ वर्षा खालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात कुडाळ संघावर विजय मिळवीत विजेतेपद पटकाविले. या कामगिरीमुळे या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत भंडारी हायस्कुलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत नियोजनबद्ध, कौशल्यपुर्ण खेळ करत सांघिक एकतेच्या जोरावर प्रथम वैभववाडी संघावर ४१ विरुद्ध ८ गुणांनी विजय मिळवला. तर उपांत्य सामन्यात सावंतवाडी संघावर ३४ विरुद्ध २१ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात तुल्यबळ अशा कुडाळ संघाबरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भंडारी हायस्कुलच्या मुलींच्या संघाने कुडाळ संघावर ३४ विरुद्ध ३३ असा विजय मिळविला. या यशामुळे या संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल या मुलींचे व क्रीडा शिक्षक आर बी देसाई तसेच प्रशिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, औनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक एच बी तिवले , तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!