१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा
कणकवली : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता हे अभियान कणकवली शहरात राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून, सर्व सफाई कर्मचारी यांच्यासाठी कणकवली नगरपंचायत व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ कणकवली नगरपंचायत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय, कणकवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव उबाळे, डॉ. शंतनू मसिरकर, डॉ. कैलास मुंडे व इतर कर्मचारी, रुचिरा साटविलकर, वैशाख गोसावी, आय. बी. गोसावी, सानवी शेळके शीतल पालव, सलोनी जाधव तसेच कणकवली नगरपंचायतचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.