20.4 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

डिजिटल मीडियाला अधिस्विकृती सोबत सरकारी जाहिराती द्या – एस.एम देशमुख

पिंपरी-चिंचवड येथे डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यशाळेत आवाहन

सावंतवाडी : डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका देण्याबाबत सरकारी जाहिराती देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यशाळेत करण्यात आले. आगामी काळात डिजीटल मीडिया अजून व्यापक होणार आहे. त्यामुळे साप्ताहिकांनी सुद्धा डिजिटल मध्ये उतरणे काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत देशमुख बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे शरद पाबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच विभागीय सचिव, विविध जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते. ‘आजची कार्यशाळा ही ३०० पत्रकारांसाठी मर्यादित होती. परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे ४०० पेक्षा जास्त पत्रकार आले आहेत. आगामी काळात अशा कार्यशाळा महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्यात येणार असल्याचेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले. देशमुख पुढे म्हणाले, ‘डिझिटल माध्यमांकडे तरुण पत्रकारांचा ओढा वाढत आहे.

त्यामुळे काळाची पावले ओळखून परिषदेने डिजिटल मीडिया परिषदेची सुरुवात केली आहे. काळानुसार बदलणे ही भूमिका कायमच परिषदेची राहिली आहे. डिझिटलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमुळे आज ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्नही सहज समोर येऊ लागले आहेत. डिजिटल माध्यमात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठीच ही कार्यशाळा आयोजित केली होती. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन केले, असेही त्यांनी सांगितले. ‘डिजिटल मीडियाला सरकारकडून जाहिराती मिळाव्यात, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करीत आहे. त्यामुळेच हळूहळू सरकारकडून डिजिटल माध्यमांना जाहिराती देण्याचे काम सुरू झाले. पण ग्रामीण भागामध्ये देखील अशा जाहिराती मिळाव्यात, यासाठी परिषदेचा लढा सुरूच राहिली,’ असेही देशमुख म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!