12.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

मगचं जर्मनीत जाॅबच्या गोष्टी सांगा ; आशिष सुभेदार

लोकांच्या बोलणी ऐकून घेण्यापेक्षा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या..

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील एका कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा,नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये, असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कट्टर समर्थक आशिष सुभेदार यांनी मंत्री दिपक केसरकर यांना लगावला आहे…

ते पुढे म्हणाले की, सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक युवकांना जिल्ह्याबाहेर काम करावे लागत आहे , गोव्यासारख्या ठिकाणी येतात असताना अपघात होऊन अनेक युवक मृत्यू पडत आहेत त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात अनेकांना आपली मुले गमवावी लागत आहे .त्यामुळे लोकांच्या बोलणी ऐकून घेण्यापेक्षा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून लोकांचे आशीर्वाद घ्यावेत नाहक कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही एक कंपनी ही दीपक केसरकर यांनी आणली होती त्या कंपनीचे मुख्य संचालक हे केसरकर यांचे मित्र होते त्यांना सिंधुरत्न मधून अनेक ठेके देण्यात आले होते,

मात्र आता कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर यावर काहीच बोलण्यासाठी केसरकर तयार नाहीत त्यामुळे मुलांचे होणारे नुकसान जबाबदार कोण याचे उत्तर केसरकरांनी द्यावे असे आशिष सुभेदार यांनी आपल्या प्रसिद्धपञकात म्हटले आहे..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!