आम. वैभव नाईक ‘ते’ पैसे राणेंच्या निवडणुकीत मतदारांना वाट्ल्याचाही आरोप..
कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. कार्यक्रम नौदलाचा असताना जिल्हा नियोजन मधून पैसे का खर्च करण्यात आले ? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला असून ते पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना वाटण्यासाठी वापरले नाहीत ना, अशी शंका देखील आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केली आहे. आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आडमार वैभव नाईक यांनी जल्हा नियोजन मधून त्या कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चच तपशीलच सादर केला.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. खरेतर मूर्तिकार आपटे याना २६ लाख रुपये आतापर्यंत पोहोच झाले आहेत. अशी माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्येसुद्धा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या राजकोट येथील पुतळा अनावरण आणि नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये हेलिकॉप्टर इंधन, डीव्ही कार, शासकीय वाहने यांचे इंधन यासाठी ३७ लाख ९० हजार, मान्यवर निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था २५ लाख ५० हजार, मंडप २ कोटी, बॅरिकेटिंग दीड कोटी, इंटरनेट,पाणीपुरवठा, ओळखपत्र छपाई यासाठी १८ लाख ५० हजार आणि जिल्ह्या बाहेरून येणारे पोलीस, अधिकारी, कर्मचारी यांचे निवास आणि भोजन यासाठी १ कोटी २२ लाख ४५ हजार असे एकूण ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये जिल्हा नियोजन मधून खर्च झल्याचा तपशील आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सादर केला.
आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, आमच्या माहिती प्रमाणे हे पैसे जिल्हा नियोजन आणि नौदल या दोघांकडूनही खर्च झाले आहेत. कारण नौसेना कोणत्याच विषयावर काहीच बोलत नाही. पुतळा प्रकरणात नौसेना गप्प आहे. २६ लाख रुपये शल्पकार जयदीप आपटे याला मिळाल्याचा आमचा आरोप आहे.त्यावर सुद्धा नौसेना काहीच बोलत नाही. त्यामुळे नौसेना कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे खर्च करण्यात आले आहेत आणि हे पैसे नौसेनेसुद्धा खर्च केले आहेत. मग एकाच कामावर दोघांकडून खर्च का, असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी ऊपस्थित करून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचारातून, पुतळा उभारणीतून, रेल्वे स्टेशन सुशोभीकरण या कामात ले पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीत मतदारांना वाटले गेल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाही. तर हि वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आरोप करत आहोत. आम्ही आरोप केल्यावर त्याचवर पालकमंत्री आणि सत्ताधाऱ्यांनी ब्र सुद्धा काढलेला नाही. उलट आमच्यावरच पुतळा पाडल्याचे आरोप झाले. ५-६ दिवसात त्याचे पुरावे देतो म्हणून सांगण्यात आले. ते पुरावे देणारे कुठे गेले? कि लोकांचा प्रश्न भ्रष्टाचारापासून वळविण्यासाठी हे आरोप केले होते का, असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी विचारला.
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे पैसे खर्च केले याबबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असून त्याची प्रक्रिया सुरु आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे. तसेच हे अधिकारी, पालकमंत्री यांनी अंदाधुंद कारभार केला आहे त्याचा पर्दाफार्श लवकरच होईल असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. पुतळा प्रकरणात पोलिसांवर दबाव असून जिल्हाधिकऱ्यानी याबाबत स्पष्टीकरण दयावे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा सेने जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी नगरसेवक श्री. काळप, माजी उपसभापती श्री. पालव, बबन बोभाटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.