मतदारांमध्ये जनजागृतीची सुरुवात
कणकवली : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात माध्यमातून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट एम 3 मशीन, कंट्रोल युनिट तालुका तहसिल कार्यालय अंतर्गत प्रात्यक्षिकासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदारांमध्ये ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक क्रंदांच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट एम 3 मशीन, कंट्रोल युनिट द्वारे थेट नागरिकांना मतदान मार्गदर्शन व जनजागृती करत प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. त्यासाठी गावागावांत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रात्यक्षिक व जनजागृती कणकवली तालुक्यात तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार कणकवली तालुक्यातील असलदे, आयनल, तोंडवली, नांदगाव या गावांमध्ये करण्यात आली.
यावेळी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल व्हॅनद्वारे मतदारांमध्ये करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट – एम 3 मशीन मशीन, कंट्रोल युनिट द्वारे प्रात्यक्षिक करुन मतदान कशा पद्धतीने होते ? जे पसंतीच्या उमेदवाराचे चिन्ह दाबले त्या चिन्हाची छबी प्रिंट होऊन व्हीव्हीपॅट एम 3 या मशीन मध्ये दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीन ते कंट्रोल युनिट पर्यंतची मतदान प्रक्रिया कशी होते ? याची माहिती निवडणूक कर्मचारी प्रविण लुडबे यांनी दिली.
ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवताना नागरिकांना व मतदारांना ईव्हीएम मशीनबाबत असलेल्या शंका दुर करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. तसेच त्या ठिकाणी डेमो स्वरुपात विविध चिन्हे बॅलेट मशीन वर दाखवण्यात आलेली आहेत. त्या मशीनच्या मदतीने पुर्ण वैयक्तिक मतदान कसे केले जाते ? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया जनजागृती करत होणा-या आरोपांबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
असलदे प्राथमिक शाळा येथे या प्रशासनाच्या पथकाने नागरीकांना प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी मंडळ अधिकारी ए.आर. जाधव, तलाठी प्रविण लुडबे, असलदे तलाठी माधुरी काबरे, सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, ग्रा.प. सदस्य दयानंद हडकर, ग्रामसेवक संजय तांबे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. जांभळे व शिक्षक उपस्थित होते. तसेच आयनल, कोळोशी , नांदगांव, तोंडवली या गावांमध्येही ईव्हीएम मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक व नागरिक विविध गावांमध्ये उपस्थित होते.