8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भगवान लोके यांचे काम आणि कार्य – दिलीप तळेकर

चेअरमन भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तुंची भेट

ग्रामस्थांची उपस्थिती पाहून भगवान लोके यांची लोकप्रियता दिसून येते

कणकवली | मयुर ठाकूर : आमचे मित्र भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृध्दाश्रमात जिवनावश्यक वस्तुंची भेट या सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थांची उपस्थिती पाहून त्यांची लोकप्रियता दिसून येत आहे. त्यांनी दाखवूनही दिल की , आपला वाढदिवस अशा ठिकाणी व्हावा , या काळात पार्ट्या न करता वृध्दाश्रमातील आजी आजोबांसोबत वाढदिवस साजरा करणं हे आनंदाचे आहे. या वृध्दाश्रमातील आजी आजोबांकडे पाहिल्यानंतर आपले आई वडील , आजी आजोबा असल्याचा भास होतो. भगवान लोके यांच्यासारखा सामाजिक बांधिलकीचा हेतू ठेवून आपल्यालाही काही करता येईल का ? याचा आदर्श ठेवला पाहिजे. पत्रकारीताबरोबर समाजात वावरताना भगवान लोके नेहमी मदतीची भावना ठेवून काम करतात. आम्ही वयाने जरी मोठे असलो तरी अनुभवाने त्यांचे काम आणि कार्य मोठे आहे. त्यांच्या सारख्या विचाराची माणसे समाजात असल्याची गरज आहे. पत्रकारीता सोबतच एक समाजकार्य म्हणून समाजाचा देण लागतो म्हणून आपल्या गावासाठी लोकाभिमूख काम आणि कार्य भगवान लोके यांच्याकडून घडत असल्याचे प्रतिपादन माजी सभापती व भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले.

असलदे येथे चेअरमन भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तुंची भेट व वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच भाई मोरजकर , उपसरपंच सचिन परब , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , माजी सरपंच सुरेश लोके , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब , परशुराम परब , शामु परब , विठ्ठल खरात , तळेरे माजी सरपंच दिनेश मुद्रस , शैलेश सुर्वे, महेश लोके , संतोष परब , सुनिल तांबे , वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेटये , बाबाजी शिंदे, पंकज आचरेकर , प्रदीप हरमलकर, प्रकाश आचेरेकर , प्रविण डगरे, दिवाकर डगरे , किशोर जेठे , मनोज लोके , रघुनाथ लोके , संतोष घाडी , प्रशांत परब , कमलेश पाटील , विजय खरात, सत्यवान लोके , वासुदेव दळवी , बाळकृष्ण परब , अमोल परब , दिनेश शिंदे , सतिश पांचाळ , सुनिल चव्हाण , पत्रकार ऋषिकेश मोरजकर , गोविंद लोके , सत्यवान परब , मधुसुदन परब , महादेव परब , मेहूल घाडी , बापू परब , सुनिल परब , विराज परब , देविदास जांभळे , सुनिल चव्हाण , बाबू जांभळे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी असलदे ग्रामस्थांच्यावतीने भगवान लोके यांचा शाल व श्रीफळ पुच्छगुच्छ देवून माजी सभापती दिलीप तळेकर , सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले , असलदे गावात माझा जन्म झाला. या गावाशी माझी नाळ असल्याने आणि लाल मातीतील जन्म असल्याने गेल्या 20 वर्षाच्या पत्रकारतेच्या कालावधीत नेहमी एक हक्काचा माणूस म्हणून काम करत राहिलो. त्यामुळेच गावातील प्रत्येक घरातील माणसांपर्यंत पोहचण्याच काम केलं. त्यातून सामाजिक बांधिलकीच काम सुरु राहिलं. गावातील लोकांनी जे प्रेम दिलं आहे. ते गेली 20 वर्षे लोकांमध्ये राहून केलेले काम आहे. हळूहळू का होईना लोकांच्या जीवनात परिपर्वतन आणण्यायासाठी जी काही मेहनत घेतली. त्याचच हे प्रतिबिंब लोकांच्या उपस्थितीतून दिसून येत आहे. गावाने सोसायटी चेअरमन पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर बिनविरोध टाकल्यानंतर गेल्या अडीज वर्षाच्या कालावधीत संस्थेची उलाढाल 12 लाखापासून 75 लाखांवर जावून पोहोचली आहे. प्रत्येक शेतक-याच्या घरापर्यंत जावून नवीन सभासद व विविध कर्ज योजना राबवण्याचे धोरण संस्थेने राबवले. गावाच्या हितासाठी विविध आंदोलने , सामाजिक प्रश्नांसाठी घेतलेला पुढाकार असेल त्याला गावातील नागरिकांनी पाठींबा दर्शवला. सामाजिक कामांचा वसा आमचे वडील माजी सरपंच सुरेश लोके यांच्याकडून लाभलेला आहे. त्याकाळात त्यांनी गावात केलेल्या कामाने आजही माझी ओळख निर्माण होत आहे. वाढदिवस हे निमित्त आहे , जीवनात जगत असताना वर्षभरात नोकरी , व्यवसायातून मिळवलेला काही रक्कमेतून जीवनावश्यक वस्तू मी या वृध्दाश्रमाला देतो.

नांदगांव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर म्हणाले , भगवान लोके यांच्या सामाजिक बांधिलकीतून हा आजी आजोबांसोबत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होत असल्याचा आनंद आहे. नेहमी नांदगाव गावातील प्रश्न सोडवण्यासाठी भगवान लोके यांचे सहकार्य लाभते. त्यामुळे नांदगाव गावातील अनेक प्रश्न भगवान लोके यांच्या माध्यमातून सोडवले. आणि अशीच समाजलोकाभिमुख कामे त्यांच्या हातून घडत राहूदेत.

 

माजी सरपंच पंढरी वायंगणकर म्हणाले , सोसायटीचे चेअरमन भगवान लोके यांनी गेल्या काही वर्षात चांगल काम उभ केलं आहे. गावातील विविध सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. चांगल्या कामासाठी आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी राहू. आणि या वाढदिवसानिमित्त मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

असलदे सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले , सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी गावात लोकाभिमुख काम उभ केले आहे. त्यामुळेच येथील नागरिक त्यांच्या पाठीशी राहत आहेत. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!