26.1 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

बनावट नोटाप्रकरणी लांजातील दोघे ताब्यात 

लांजा : बनावट नोटांप्रकरणी राजस्थान पोलिसांनी लांजा येथे एका कामगारासह लांजातील दोन स्थानिकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे बनावट नोटांची पाळेमुळे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही दिवसापुर्वी कुडाळ येथेही बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी तीघांवर कारवाई करण्यात आली होती.

सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा डिपॉझिट केल्याचे प्रकरण दोन महिन्यापूर्वी लांजा येथे घडले होते. याप्रकरणी लांजा येथील एका किराणा व्यवसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे लांजा तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट असल्याचे या प्रकरणानंतर उघडकीस झाले होते. त्या दृष्टीने लांजा पोलिसांचा देखील तपास सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!