सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी शेकडो गाड्यांतून कोकणवासीय गावी आले होते. त्यांच्या परतीसाठी एसटी प्रशासनाकडून गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग विभागातून शेकडो जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एसटीच्या प्रवाशांना ६० दिवस आधीपासून गणेशोत्सवासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध केली होती. घरबसल्या मोबाइलवरून एसटीचे आरक्षण करणे प्रवाशांना सुलभ झाले. गौरी – गणपती विसर्जन झाल्यानंतर त्याच दिवसापासूनच जादा गाड्यांची व्यवस्था सिंधुदुर्ग विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ आगारातून बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.