कणकवली : लोरे नं १ नरामवाडी येथील घर बांधणीच्या कारणावरून एका कुटुंबामध्ये मारहाण झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण सात जणांवरती कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल श्रीधर धुमक यांच्या फिर्यादीवरून हरिश्चंद्र बाळकृष्ण धुमक (४६), हर्षला हरिश्चंद्र धुमक (२७) व शुभम हरिश्चंद्र धुमक (२०) यांच्यावर तर हर्षला हरिश्चंद्र धुमक यांच्या फिर्यादीवरून आकाश श्रीधर धुमक (२७), कुणाल श्रीधर धुमक (२६), शितल आकाश धुमक (२६) व लता श्रीधर धुमक (५५) सर्व राहणार लोरे नं. १ नरामवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
कुणाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी बुधवारी सकाळी फोंडाघाट बाजारपेठ येथे असताना मला भाऊ आकाश याचा मला फोन आला. तो म्हणाला घरी चुलत बहीण हर्षला ही शिवीगाळ करत आहे त्यामुळे तू घरी लवकर ये असे सांगितले. मी अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आलो असता बहीण हर्षलाही घरी शिवीगाळ करत होती. त्यामुळे मी तिला तू शिवीगाळ का करतेस असे विचारले त्यावेळी ती म्हणाली तुझी आई आम्ही हे घर बांधले असे गावामध्ये सर्वांना सांगत आहे. जे कोणाशी म्हणत आहे त्याला माझ्यासमोर घेऊन ये असे मी तिला सांगितले असता त्याचा तिला राग आल्याने हर्षला माझ्या अंगावर धावून आली. त्यावेळी माझे आई व वहिनी सोडवण्यासाठी आले असता हर्षला व त्यांच्या झटापट झाली या झटापटीत हर्षलाचे कपडे फाटले. त्यादरम्यान मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता हर्षला हिने माझ्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला. त्यावेळी हर्षलाईचे वडील हरिश्चंद्र व भाऊ शुभम धुमक येथे ते आले व वहिनी शितल तिच्या कानाखाली मारली. तसेच यापुढे तुम्हाला घरात घेणार नाही अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.
हर्षला धुमक हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आणि घरामध्ये असताना आकाश, कुणाल, शितल व लता धुमक हे सर्व घरामध्ये घुसून माझ्या वडिलांना व मला शिवीगाळ करू लागली. त्यावेळी माझी बहीण सोडवण्यासाठी आली असता त्यांनी तिला खाली पडून लाथा बुक्क्याने व हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच कुणाल व आकाश धुमक यांनी यापुढे आमच्या वाटेला गेला तर बघा अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.