0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

मसुरे या नावासाठी नवतरुण मित्र मंडळ चांदेर यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

मसुरे : गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला बसला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी तसेच सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्याकडे या ग्रामपंचायतीचे नाव मसुरे अथवा ग्रामपंचायत च्या नावामध्ये मसुरे असा उल्लेख असावा अशी मागणी वारंवार करूनही अद्याप पर्यंत शासन दरबारी यश आलेले नाही. अनेक वेळा लेखी निवेदने तसेच ग्रामपंचायत ठराव लेखी स्वरूपात दाखल करूनही याबाबत शासन दरबारी कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. ग्रामस्थांचा हा प्रश्न येत्या काही दिवसात सुटला नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर मसुरे चांदेरे येथील नवतरुण मित्र मंडळ आणि ग्रामस्थ बहिष्कार घालण्याच्या विचारात असल्याची माहिती या मंडळाच्या वतीने राजू मुळीक यांनी दिली.

मर्डे ग्रामपंचायत चे नाव मसुरे होण्यासाठी गेली पाच वर्ष मसुरे ग्राम विकास संघ सर्व स्तरावर ती प्रयत्न करत आहे. याबाबत अगदी ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवरतीही आवाज उठवण्यात आला होता. याबाबत मर्डे ग्रामपंचायत ने लेखी स्वरूपात निवेदन सर्व संबंधित वर्गाकडे दिले होते.

मसुरे ग्रामविकास या संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच भंडारी समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मसूरकर यांनी सुद्धा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर हा प्रश्न सुटला नाही तर बहिष्कार घालणार असल्याचे पूर्वीच सांगितले आहे.

आंगणेवाडी ग्रामस्थ श्री बाळा आंगणे यांनी सुद्धा या प्रश्नासंदर्भात अनेक वेळा आवाज उठविला आहे.
ग्रामस्थांची अथवा ग्रामपंचायती मागणी नसतानाही प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने विभाजन करताना या ग्रामपंचायतीचे नाव बदलून मर्डे ग्रामपंचायत असे नामकरण केले. यामुळे मसुरे गावाची ओळख पुसली गेली आहे. असे असतानाही प्रशासन दरबारी कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर येत्या निवडणुका वरती बहिष्कार घालण्याचा विचार येतील ग्रामस्थ करत आहेत अशी माहिती राजू मुळीक यांनी दिली. बाबत प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी ही राजू मुळीक यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!