कणकवली : कॉग्रेसचे राहुल गांधी यानी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर भारतातील आरक्षण व संविधान संपवणार या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कणकवली भाजपा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी तळेरे एस. टी बस स्थानकासमोर समोर काँग्रेस हटाव.. देश बचाव.. महाविकास आघाडी हटाव.. महाराष्ट्र बचाव.. राहूल गांधी मुर्दाबात अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यावेळी कणकवली भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी जि. प. सदस्य संजय देसाई, माजी सभापती प्रकाश पारकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच सचिन परब, चेअरमन भगवान लोके, बूथ अध्यक्ष संतोष परब, बबलू पवार, रमाकांत राऊत, राजेश जाधव, उदय बारस्कर, श्रीपत पाताडे, दिनेश मुद्रस, युवामोर्चा उपतालुकाध्यक्ष चिन्मय तळेकर, किरण चव्हाण, संदिप घाडी, भरत चव्हाण, मंगेश कांबळे, सागर डंबे, सचिन पिसे, राजा जाधव, निलेश सोरप, नंदू गोसावी, निळकंठ पाटील, नामदेव वाडेकर, विजय आचरेकर, रघुनाथ लोके, प्रवीण डगरे, मनोज लोके, प्रदीप हरमलकर, पंकज आचरेकर, संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर, सागर आचरेकर, सुयोग तळेकर, संदीप गांधी, तेजस जमदाडे, मनिष पिसे, शेखर शिंदे, शेखर कांबळी याच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दिलीप तळेकर म्हणाले, आरक्षण आणि संविधान संपवू पाहणा-या काँग्रेसचा जाहिर निषेध असून येत्या काळात काँग्रेस आणि महाविकास अघाडीला जनता जागा दाखवून देणार असून याचे खरे चेहरे राहूल गांधीच्या वक्तव्यामुळे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राहूल गांधी यानी देवदेवता व स्वामीबद्दल व्यक्तव्य केली यावेळी महाविकास अघाडीचे नेते मूग गिळून गप्प होते. हे सर्व भारतातील जनतेने बघितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता राहूल गांधीला थारा देणार नाही असे सांगितले.
तर प्रकाश पारकर, राजेश जाधव, नामदेव वाडेकर यांनी आपली मत व्यक्त करीत राहूल गांधीच्या विरोधात जोमदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.