4.7 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

स्थानिक स्तरावरील मनुष्यबळ यंत्रणा सक्षम होणे आवश्यक : उद्योजक डाॅ दीपक परब

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचा ‘मी उद्योजक होणार’ मार्गदर्शन कार्यक्रमात राज्यातील मान्यवरांची उपस्थिती. 

मालवण  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वायरी येथील आर जी चव्हाण मंगल कार्यालय येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचा ‘मी उद्योजक होणार’, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा उद्योग व सामाजिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष व उद्योजक डाॅ. श्री दीपक परब व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला श्रीकांत सावंत यांच्या शुभहस्ते वंदन करुन आणि पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचा सुसंघटन हेतू स्पष्ट केला. श्रीकांत सावंत यांनी मान्यवर उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष डाॅ दीपक परब यांना शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा व अन्य मान्यवरांचा सत्कार केला.

विशेष उपस्थित मान्यवर उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष डाॅ दीपक परब यांनी कोकणातील स्थानिक स्तरावरील मनुष्यबळ सक्षमतेवर भर दिला तर विकासकामे सुरळीत व्हायला सुरवात होईल असे सांगितले. ग्रामीण स्तरावरील छोट्या छोट्या वाटणार्या प्रशासकीय गोष्टींचा लेखाजोखा घेत घेत संघटनेने काम केले तर त्याला योग्य दिशा मिळेल असेही त्यांनी सांगितले.

आर. जी चव्हाण मंगल कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील उद्योजक, व्यवसायिक यांनी उपस्थिती दर्शवली आणि त्यांचा औद्योगिक प्रवास कथन केला. मृदा परीक्षणा संदर्भातील इंडिग्रास कन्सल्टन्टसचे श्री आनंद कोलते यांनी माती परीक्षण, शेती व विविध योजनांच्या तंत्रशुध्द लाभा संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. मालवणच्या अतिथी बांबू हाॅटेलचे प्रोप्रायटर संजय गावडे व देवगडच्या सूर्या टेलरींगचे सर्वैसर्वा सूर्यकांत लाड यांनी त्यांचे व्यावसायिक मनोगत व्यक्त केले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी आगामी दोन महिन्यात आपल्या विकास परीषदेचेत दोन लाख सदस्यांची नोंदणी व्हावी असे आवाहन केले व संघटन शक्तीनेच आपण अनेक अशक्य वाटणारी विकासकामे साध्य करु शकू असे प्रतिपादन केले. यापुढे सुद्धा आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या खेड्याचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा आणि राष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न करूया तसेच गावागावात छोटे-मोठे उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करूया.

या कार्यक्रमाला उद्योजक डाॅ दीपक परब, श्रीकांत सावंत, शंकर शेखर, मालवणच्या अतिथी बांबू हाॅटेलचे प्रोप्रायटर संजय गावडे, प्रवासी संघटनेचे दीपक चव्हाण, मंगलमूर्ती इलेक्ट्रीकल्सचे चंद्रकांत कडव, मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, आर जी चव्हाण मंगल कार्यालयाचे मालक व समाजसेवक आप्पा चव्हाण, मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य हरीश उर्फ दादा वेंगुर्लेकर, युवा समाजसेवक ऐश्वर्य मांजरेकर, प्रदीप चव्हाण, कवीराज जाधव, सूरज वळंजू, मिलिंद बागवे, राजन कामत, संतोष हिवाळेकर, आंबा व्यवसायिक लुडबे व अन्य उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!