10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यातील १३ घरफोड्या व मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड

आरोपींकडून ८६,२६,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश

कोल्हापूर | यश रुकडीकर : सध्या कोल्हापूर पोलीस अँक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे.घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश भेटले आहे.कोल्हापूर,सांगली,सातारा या जिल्ह्यांमध्ये १३ घरफोड्या ह्या टोळीने केल्या होत्या व एक मोटारसायकल चोरी केली होती.ह्या टोळीला अटक करून आरोपींकडून सुमारे ८६,२६,१०० इतक्या किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सतत घडत असलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी शाखेकडील पोलीसांचे पथक याकामी लावले होते. चोरीला गेलेले दागिने विक्री करण्यासाठी एक इसम मुरगूड नाक्याकडून सिद्धनेर्लीकडे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची खबर निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली.या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून विक्रम उर्फ राजू बाळू कित्तुरकर,वय ३१, रा.इंदिरानगर हालशी, ता. खानापूर, जि.बेळगाव याला पकडले.त्याची अंगझडती घेतल्यावर सोन्या- चांदीचे दागिने सापडले.त्याची सखोल चौकशी करताना कित्तुरकर व त्याचा साथीदार महादेव नारायण धामणीकर, रा. हालशी,बेळगाव या दोघांनी गेल्या आठ महिन्यांपासून कोल्हापूरमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले.आरोपी महादेव धामणीकर याला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे.

हे आरोपी कर्नाटक राज्यातून एसटी बसने कोल्हापूरला येत.येथील मोटारसायकल चोरून घरफोड्या करत व पुन्हा मोटारसायकल कोल्हापूर ते कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यावर लाऊन एसटीने परत आपल्या गावी जात व चोरी केलेले दागिने वाटून घेत.त्यांच्याकडून एकूण १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने, १४३० ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या २ मोटारसायकल असा एकूण ८६,२६,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस करत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर,सहा.पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे,सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ,पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव,जालिंदर जाधव,शेष मोरे,हिंदुराव केसरे,सुरेश पाटील,समीर कांबळे, दिपक घोरपडे,संजय पडवळ,प्रशांत कांबळे,राजेश राठोड,संजय कुंभार आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!