एस. टी. कामगार सेनेचा झंझावात
अनुप नाईक यांच्यासह सावंत, धुरी आणि पुनाळेकर यांचा सत्कार..
कुडाळ: शिवसेना उबाठा प्रणित कामगार सेनेच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटाच्या सावंतवाडी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी कामगार सेनेत प्रवेश केला. यावेळी संपकाळात मोलाची कामगिरी बजावलेले कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, तालुकाप्रमुख आबा सावंत, विभागीय सचिव आबा धुरी तसेच संजीव पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
संपकाळात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले एस. टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, तालुकाप्रमुख आबा सावंत, विभागीय सचिव आबा धुरी तसेच संजीव पुनाळेकर यांचा छोटेखानी सत्कार एस.टी. कामगार सेना सावंतवाडी आगार अध्यक्ष अमित आडके,सचिव उल्हास चव्हाण यांच्या माध्यमातून आगारातील इतर कर्मचाऱ्यांनि आयोजित केला होता.
यावेळी एस.टी. कामगार सेनेचे केंद्रीय नेतृत्व हिरेन रेडकर,सुभाष जाधव,प्रदीप धुरंधर यांनी कृती समितीत बजावलेली संयमी आणि योग्य भूमिका आणि स्थानिक पातळीवर संप यशस्वी करण्यासाठी आगारात ठाण मांडून बसणारे आणि कर्मचाऱ्यांना मानसिक आधार देत त्यांच मनोबल वाढवणाऱ्या एस.टी. कामगार।सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक, सचिव आबा धुरी, तालुकाप्रमुख आबा सावंत यांच्या कार्यपद्धती मुळे शिंदे सेना प्रणित राष्ट्रीय कामगार संघटनेतुन कर्मचाऱ्यांनी शिवासेना प्रणित महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार सेनेत सावंतवाडी विधानसभा समन्वयक बाळा गावडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
आपण वेळोवेळी कामगार सेनेचे पदाधिकारी कसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात हे बघितलं आहे त्यामुळे आम्ही आज प्रवेश करत असल्याचं प्रवेश केलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.यावेळी विक्रम पाटील, मोतीलाल कांबळे, दिपक कांबळे, संदिप हेवाळे, सचिन कांबळे, संदिप चौगुले, राजा कांबळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी एस.टी. कामगार सेनेत प्रवेश केला.
आज झालेला आमचा सत्कार हा आगारातील सर्व कर्मचारी यांचा असल्याचं मत अनुप नाईक यांनी व्यक्त केलं तर यापुढेही कायम कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या न्याय हक्कासाठी असेच लढत राहू असा विश्वास आबा सावंत यांनी कर्मचाऱ्यांना दिला. प्रास्ताविक विलास पाटील यांनी केलं.