28.2 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपला कार्यभार स्विकारला

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. तावडे यांनी आपल्या वैद्यकीय कारणासाठी बदली मागितली होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर पाटील यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यानुसार श्री. पाटील यांनी आज आपला कार्यभार स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार विरसींग वसावे, ओमकार ओतारी,श्री ठाकूर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!