जयवंत रामचंद्र काणेकर यांचे निधन
कणकवली : मसुरे येथील जयवंत रामचंद्र काणेकर ( वय – ७७ ) यांचे अल्पशा आजाराने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवस ते अल्पशा आजाराने आजारी होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
भाजपच्या महिला तालुका उपाध्यक्ष, कणकवलीच्या संजना सदडेकर यांचे ते वडील होत तर डॉ. विद्याधर तायशेटे यांचे ते मामा होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार होता. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.