19.2 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना मिळणार गती 

रिवाईज इस्टिमेट असलेली कामे मार्गी लागणार

38 कोटी मधील उर्वरित रक्कम त्वरित देण्याचे जल मंत्री पाटील यांचे आदेश

योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी मनुष्यबळाचा ही पुरवठा करणार

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने मंत्री पाटील यांनी घेतली आढावा बैठक

कणकवली : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत कामांची बैठक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी रिवाईज इस्टिमेट असलेली कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 38 कोटी या योजने अंतर्गत मंजूर असताना फक्त 17 कोटी प्राप्त झाले त्यामुळे उर्वरित रक्कम त्वरित अदा करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले. त्याचप्रमाणे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्टाफ कमी असल्यामुळे कामे प्रलंबित राहतात हा स्टाफ नव्याने भरण्याचे आदेशही मंत्री महोदयांनी दिले आहेत.

परिपूर्ण सर्वे झालेला नसल्याने जल जीवन च्या अनेक योजना अपुऱ्या व अर्धवट स्थितीत राहिल्या होत्या. या मुळे काही ठिकाणी अनेक वाड्या, वस्त्या या योजनेपासून वंचित राहत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देण्याची मागणी गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्याला अखेर यश आले आहे. तसेच कणकवली मतदारसंघातील जलजीवन योजनेच्या कामांकरता 38 कोटीची आवश्यकता होती यातील 17 कोटी रक्कम प्राप्त झाली बाकी असलेली रक्कम देण्यात साठी आमदार नितेश राणे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याबाबत श्री पाटील यांनी तात्काळ ही रक्कम देण्याचे आदेश दिले.

मुंबई येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार नितेश राणे यांच्यासह जलजीवन मिशनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जल मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला सूचनांमुळे प्रलंबित असलेली कामे अधिक गतिमान होणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!