1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

एसटीच्या सुरू असलेल्या संपात भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा सहभाग नाही…

सावंतवाडीच्या आगार व्यवस्थापकांना निवेदन..

सावंतवाडी : प्रलंबित मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला आहे.या कृती समितीत भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा सहभाग नसल्याचे निवेदन आगार व्यवस्थापक सावंतवाडी यांना देण्यात आले. त्यामुळे एसटीचे बंद असलेले काम काही प्रमाणात सुरू राहणार आहे.

याबाबत आगार व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आज दिनांक 3 सप्टेंबर पासून राज्य परिवहन महामंडळात कृती समितीचा संप सुरू असून या कृती समितीत भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा सहभाग नसल्याने सावंतवाडी आगारात सुरू असलेल्या संपात भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचे पदाधिकारी व सदस्य कोणत्याही प्रकारे सहभागी नाहीत याची नोंद घ्यावी. यावेळी अजय गोंदावळे विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर,संदेश टेंमकर,आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!