7.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

मसुरे येथे घराला आग, वृध्दाचा जागीच मृत्यू

पत्नी गंभीर जखमी; दोघांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न

मालवण : मसुरे मेढावाडी येथील प्रभाकर सदाशिव माने ( वय ७८) यांच्या घराला आग लागून त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी शुभदा (वय ७०) गंभीर जखमी आहे. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत माने कुटुंब यांचे पूर्ण घर जळून खाक झाले आहे. जखमी शुभदा यांच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहीती अशी की, मुंबई येथून आलेले प्रभाकर माने हे दुपारी जेवण वैगरे केल्या नंतर एका खोलीत आराम करत होते. दरम्यान शेजारील घरातील आपा सावंत यांना छपरातून धूर येत असल्याचे दिसू लागल्याने त्यांनी घरात पहिले असता दर्शनी भागातून घराच्या छपराला आग लागल्याचे दिसून आले. शेजारील महिला व ग्रामस्थांनी घरात धाव घेत त्यांना बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान आगीने जोरात पेट घेतल्याने खोलीत असलेले प्रभाकर माने बाहेर पडू शकले नाही.तर शुभदा माने या घराबाहेर पडत असताना अंगणात पडल्याने जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे उपचार करून सिटी स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. ग्रामस्थांनी पेटत्या घरात प्रवेश करत पहिले असता एका खोलीत भाजलेल्या अवस्थेत ते आढळून आले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर आणत अधिक उपचारासाठी नेले. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे यांनी सांगितले.

मालवण नगरपंचायतचा अग्निशमक बंब बोलावण्यात आल्या नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास हा बंब त्वरित दाखल झाला. घराच्या छपराला आग लागल्याने बाजूच्या दोन घराना आगीमुळे धोका निर्माण झाला होता.अग्निशमक बंब आल्यानंतर आगीवार नियंत्रण मिळविण्यात यश आले ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर,पोलीस विवेक फरांदे, उपसरपंच राजेश गावकर, शिवाजी परब, संग्राम प्रभूगावकर, छोटू ठाकूर, सौ लक्ष्मी पेडणेकर, डॉ विश्वास साठे, जगदीश चव्हाण, बाबू आंगणे, कोतवाल सचिन चव्हाण, विनोद मोरे, सुदर्शन मसूरकर यांनी पाहणी करत मदत कार्यात सहभाग घेतला. विजवितरण कर्मचारी अमित बागवे, श्री. परब यांनी दाखल होत वीज पुरवठा खंडित केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!