8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

….तर आम्ही परशुराम उपरकर यांच्या पाठीशी

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड माफी केव्हा मागणार ?

मी तो नव्हे म्हणणाऱ्या सर्वगोड यांचे फोटो काढले बाहेर

कणकवली : बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड उपरकर हे आपल्याला माहितीच्या अधिकार येथे तक्रारी करुन आम्हाला नाहक त्रास देतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्यात मला नाहक त्रास देतात. याबाबत माजी आ. परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी. असे पत्र बांधकामच्या वरिष्ठ अधिका-यांना अजयकुमार सर्वगोड यांनी दिले आहे. जर परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांनी सांगत पुतळा दुर्घटनेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागीतली. मग कर्ता करविता या घटनेतील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड माफी केव्हा मागणार ? असा सवाल त्यांनी केला आहे.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळील उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत, राजू राठोड, समीर परब, विलास गुडेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपतींचा पुतळा उभारण्यात आल्यावर सर्व अधिका-यांना, नेत्यांना माहिती होती आजूबाजूला सौंदर्याकरण, मजबुतीकरण , हॅलीपॅड ही कामे करण्यात येणार होती. त्याची माहिती अगोदरच सर्वगोड यांना होती. त्यांना एक विचारायचे आहे, ज्यापध्दतीने महनीय व्यक्ती येणार आहेत, त्यांना हॅलीपड करायचे आहे. त्यासाठी निविदा मागवल्या, त्या लेवलची क्षमता असलेल्या ठेकेदरांची निविदा मागवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या थोर महापुरुषांचा पुतळा उभारण्यात येणार ही माहिती होती. ती कामे तुकडे करून सोसायटी का दिली गेली, एवढी घाई का करण्यात आली ? हॅलीपॅडप्रमाणे चांगला ठेकेदार का नेमला नाही. त्यामागचा उद्देश काय? सर्वगोड यांची यांची माध्यमांमध्ये कात्रणे आहेत, ते स्वतः सर्व कामांचे श्रेय घेत आहेत, बांधकाम विभागाने जमीन हस्तांतरण केले. स्वतः श्रेय घेत होते. मग त्यावेळी वास्तव असे आहे, ज्या सोसायटी नावे कामे आहेत, त्या सोसाटीयच्या एकाही मजुरान् काम केलं नाही. त्या नाव वेगळे त्या सोसायटीच्या नावाने बेनामी ठेकेदारांनी कामे केली आहेत. सर्वगोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज याची शपथ घेवून सांगावे की, राजकोट किल्ल्याच्या सौदर्दीकरणाचे ज्या ठेकेदारांने काम केले. त्याच ठेकेदारांनी पुतळ्याचे काम केले. हे शपथ घेवून सांगावे. जर सीसीटीव्ही फुटेज मिळत नसेल तर सॅटेलाईट वरुन फोटो घ्यावेत. त्या ठिकाणच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप हा सर्वगोड यांचा होता असा आरोप कन्हैया पारकर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार म्हणून हॅलीपॅडचे काम चांगल्या ठेकेदाराला देता. आणि छत्रपतींच्या पुतळ्याचे काम सोसायटींना देता हे कुठल्या अधिकारात दिले. एकतरी सोसायटीचा कामगार होता का ? हे सर्वगोड यांनी सांगावे, याची चौकशी शासनाने करावी. कार्यकारी अभियंता सर्वगोड हे उपरकर यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. जर त्यांनी माहिती मागितली असेल आणि ती चुकीची असेल तर कायद्याने उत्तर द्या. तुम्हाला आजच कळले आहे का ? 80 माहितीचे अधिकार अर्ज दाखल केले आहेत. पुतळा दुर्घटनेत सर्वांनी माफी मागीतली. मात्र सर्वगोड यांनी अद्यापही माफी मागितली नाही. जिल्ह्यातील राजकारण काही असुदेत, पण एक शिवप्रेमी म्हणून माजी आ. परशुराम उपरकर यांचे आम्ही समर्थन करतो. अशा प्रकारे धमकी सर्वगोड यांनी देवू नये. जीकाही समिती गठीत केली आहे, जो कोण शिल्पकार जयदीप आपटे आहे. कार्यकारी अभियंता, आपटे आणि चेतन पाटील यांचे संभाषण आणि सीडीआर चेक करा. काही नेत्याच्या जीवावर वरीष्ठ अधिका-यांना खिशात घालणारा हे सर्वगोड अधिकारी आहेत. सर्वात मोठा भ्रष्टाचार सर्वगोड यांनी केली. या बांधकाम विभागात शेकडो कोटीची कामे अशाच पध्दतीने सर्वगोड यांनी केली आहेत. काम अगोदर आणि निविदा नंतर अशी पध्दत त्यांची आहे. बे-बनावी ठेकेदारी या सर्वगोड यांच्या कालावधीत झालेली आहे. त्यामुळे शासनाने कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची कसुन चौकशी करावी. या चौकशीत हस्तक्षेप नको म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!