-1.4 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

इन्सुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेसाठी निवड

बांदा : शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय बालचित्रकला स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. गट क्रमांक ४ मध्ये सोहम विलास गावडे आणि गट क्रमांक ३ मध्ये मयुरी गुरुनाथ पाटील हिने यश प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. आजगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्या विकास मंडळ, इन्सुलीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य आणि नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!