कणकवली : शहरातील विद्यानगर येथील आरती सदानंद चव्हाण ( वय २३ ) ही युवती शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कुडाळला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे वडील आनंद चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. तिचा वर्ण सावळा असून उंची ५ फूट २ इंच, केस काळेमध्यम राखलेले, चेहेरा उभट, शरीराने मजबूत, नेसनीस काळ्या रंगाचा वनपीस, ओठावर मोठा तीळ, डाव्या बाजूला भाजलेली खुणा अशा वर्णाची युवती कुणाला आढळून आली तर त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन, पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.







 
                                    
