10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

छत्रपतींचा पुतळा प्रकरणी विरोधकांकडून केवळ राजकारण ; भाजपचा आरोप

सावंतवाडी भाजप कडून महाविकास आघाडीचा निषेध

सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा दुर्घटने प्रकरणी माफी मागितली असताना देखील विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे केला. दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आरडाओरड वरून शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवर राजकारण करत आहेत असा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

येथील भाजप तालुका कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी,मनोज नाईक, रवी मडगावकर,उदय नाईक,अजय सावंत, सचिन बिरजे, प्रमोद गावडे, बंटी जामदार ज्ञानेश्वर पाटकर बंड्या कोरगावकर, कलेक्टर फर्नांडिस सविता टोपले, सचिन साटेलकर, परीक्षीत मांजरेकर, मधुकर देसाई, दीनानाथ नाईक, मेघना साळगावकर, पिंट्या सावंत, विनायक परब,विनोद सावंत,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साऱ्यांसाठी वंदनी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली, देशातील तमाम शिवभक्तांनी ही माफी मागितली. शिवरायांचे स्मारक दुर्घटनेत ज्या ज्या व्यक्तींच्या हदयाला ठेच पोहचली त्यांची देखील माफी मागितली.तरी देखील महाविकास आघाडीचे नतदृष्टे नेते राजकारण करत असून निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात अराजी पसरवण्याचे काम करत आहे. म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज महायुती रस्त्यावर उतरली असल्याचे मत संजू परब यांनी बोलताना व्यक्त केलंय.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!