एरव्ही तात्काळ ट्विट ; मात्र राजकोट घटनेची चार दिवसांनी दखल
सावंतवाडी : राजकोट येथे घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी माफी मागितली खरी परंतु माफी मागण्याची जागा चुकली, असा खंतवजा टोला शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी लगावला आहे.
दरम्यान आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी ही माफी मागितली आहे. एरवी एखादी घटना घडल्यानंतर त्यांच्याकडून तात्काळ ट्विट केले जाते. परंतु या गोष्टीसाठी त्यांना ४ दिवसाचा वेळ लागला. हे दुर्दैवी आहे,असे त्यानी म्हटले आहे.याबाबत श्री. परूळेकर आणि प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, कुठल्याही छोट्या-मोठ्या घटनेवर पंतप्रधान तात्काळ ट्विट करतात. परंतू मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेबाबत तब्बल ४ दिवसांनी त्यांनी माफी मागितली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीत उभारलेला पुतळा ८ महिन्यात पडला. ही बाब मनाला वेदना देणारी आहे. पंतप्रधान काल महाराष्ट्रात वाढवण येथे आले होते. त्यामुळे ते राजकोटला येऊ शकले असते. परंतु त्यांनी माफी मागितली ती जागा चुकली, असेही त्यांनी म्हटले आहे.