वैभववाडी : श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी अंतर्गत कृषीकन्या ( जामदारवाडी – करुळ ) यांनी व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अळंबीमध्ये, धिंगरी (Oyster – white) अळंबी लागवडीची पद्धत अत्यंत सुलभ आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या अळंबीच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारच्या माध्यमाची (पदार्थाची) आवश्यकता नाही. ज्याचे विघटन सहज आणि त्वरीत होते, असे कोणतेही माध्यम या अळंबीच्या लागवडीसाठी वापरता येते.
ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीकन्या गायत्री पाटील , सानिका निकम ,श्वेता शेलार, पूनम रसाळ, प्राजक्ता मोरे यांनी भाताच्या पेंड्यांचे माध्यम वापरून आळंबी लागवड कशी करावी, त्याची पद्धत , त्यासाठी घ्यावयाची काळजी, इत्यादी गोष्टींची माहिती सांगितली. तसेच आळंबी लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल व त्याची मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली बाजारपेठ, त्यातून होणारा फायदा इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांना पटवून दिल्या.प्रात्यक्षिकासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी कृषीकन्यांचे भरभरून कौतुक केले.