सावंतवाडी : मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे पडझडीच्या घटना सुरूच आहेत. सावंतवाडी ते रेल्वे स्टेशन मार्गावरील शालू मंगल कार्यालयालगत असलेले एक झाड मुख्य मार्गावर कोसळले आहे. हे झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळल्यामुळे वाहिन्यांही तुटल्या आहेत. मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. सद्यस्थितीत या मार्गावर एका दिशेने वाहतूक सुरू आहे. सदरचे झाड त्वरित बाजूला करावे तसेच तुटलेल्या विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करून विद्युत प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.