4.4 C
New York
Sunday, March 15, 2026

Buy now

जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी मी सक्षम ; खा. नारायण राणे

सावंतवाडीत संजू परब यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

सावंतवाडी : मालवण येथे झालेली घटना दुदैवी आहे त्याचे राजकारण केले जाऊ नये. मी उद्या दुपारी त्या ठिकाणी भेट देणार आहे. काही पक्षांचे नेते जिल्हयात येणार आहेत मात्र कितीही जण आले तरी मी या जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी मी सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

श्री.राणें आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी येथील भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सावंतवाडी शहरात आयटी क्षेत्राच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या युवा उद्योजक प्रफुल गोंदावळे यांचा यावेळी खा नारायण यांनी सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!