10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

अज्ञात वाहनाच्या धडकेत बावशी येथील संदीप तांबे या तरुणाचा मृत्यू

नांदगाव / कणकवली : देवगड निपाणी रस्त्याने बावशी येथे जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बावशी येथील संदीप गणपत तांबे (४०) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आरती तांबे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात सोमवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास वाघेरी फाटा येथे झाला. याप्रकरणी नारायण बापू मांडवकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चाकी वाहन चालकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप तांबे यांच्या सासऱ्यांचे दिवस कार्य असल्याने त्यांची मेहुणी पियू अविनाश राऊत ही बावशी येथे आली होती. सोमवारी रात्री पियू राऊत ही लक्झरी बसने पुणे येथे जात असल्याने संदीप तांबे हे पत्नीसह तिला सोडण्यासाठी मोटरसायकलने फोंडा येथे गेले होते. संदीप तांबे हे मेहुणीला सोडून मध्यरात्री १२.१५ वाजाताच्या सुमारास पत्नीसह देवगड निपाणी रस्त्याने बावशी येथे जात होते. त्यादरम्यान त्या मार्गाने जाणाऱ्या चार चाकी वाहनाची संदीप तांबे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक बसली. या धडकेत संदीप तांबे हे रस्त्याच्या मधोमध पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच मोटरसायकलवरील संदीप तांबे यांची पत्नी रस्त्याच्या डाव्या बाजूला पडल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या. मोटर सायकलला धडक बसताच अज्ञात चार चाकी चालकाने वाहनासह तेथून पळ काढली. त्यानंतर जखमी आरती तांबे यांनी या अपघाताची माहिती फोनवरुन नारायण बापू मांडवकर यांना दिली. नारायण मांडवकर हे वाघेरी फाटा येथे येऊन खाजगी रुग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीप तांबे यांना तपासून मयत घोषित केले. संदीपच्या निधनाचे वृत्त समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!