कनेडी : तालुक्यात मागील काही वर्षांपासून वाघ, बिबट्या, हत्ती, गवारेडे अशा वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यात प्रामुख्याने बिबट्यांचा वावर हा फार मोठ्या प्रमाणात आहे. कनेडी बाजार पेठ मार्गे जाणाऱ्या एका कारचालकला हा बिबट्या अगदी कारच्या समोरच दिसला. ही घटना सोमवारी रात्री ची असल्याची माहिती मिळाली. अलीकडेच कनेडी भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणत वावर सुरू झलयाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हळवल, शिरवल,
कळसुली, शिवडाव, कनेडी, सारख्या ग्रामीण भागात जायचे झाले तर बिबट्या पाहायला मिळणारच, अशी चर्चा सत्य ठरू लागली आहे. मात्र या बिबट्यांच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभाग यावर पर्याय म्हणून बिबट्यांच्या बंदोस्तासाठी काय पाऊले उचलणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.