मालवण : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधित जबाबदार दोन व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.