8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

दशावतार कला म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा कणा – विशाल परब

दशावतार कलाकारांचा केला सन्मान.

सावंतवाडी : दशावतार ही कला म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्राचा कणा मानला जातो. “रात्रीचा राजा आणि सकाळी कपाळावर बोजा” अशी एक म्हण पूर्वी कोकणात रूढ होती. याचे कारण म्हणजे या लोककलेला राजाश्रय नव्हता. मात्र अलीकडे भारतीय जनता पार्टीने दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांनी या कार्यात भरीव सहयोग आजवर अनेकदा दिलेला आहे. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.

दरम्यान या कलेचे जतन करण्यासाठी अनेक कोकणी कलाकारांनी आपले आयुष्य खर्च केले आहे. अशा दशावतारी कलाकारांच्या मुलांचा गुण गौरव सोहळा दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ सावंतवाडी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीदेवी माऊली मंदिर इन्सुली येथे आज आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशालजी परब यांनी वेळोवेळी दशावतारी कलाकारांच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी मदत केली आहे.त्या जाणीवेतून सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघातर्फे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशालजी परब यांना या कार्यक्रमासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आलेले होते.

दहावी बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या अनेक मुलांचा गुणगौरव सोहळा यावेळी करण्यात आला. सायंकाळी सावंतवाडी तालुक्यातील निवडक कलाकारांच्या संचात दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. दशावतारी कलेचा अभिमान आणि वारसा पुढील पिढीनेही धारण करायला हवा, यासाठी या मुलांच्या समोर दशावतारी कलाकार आपल्या निवडक कलाकारांच्या संचात हा नाट्यप्रयोग साजरा केला होता. श्री विशाल परब यांनी या आगळ्या कल्पनेचे कौतुक करत दशावतार कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत अभिनंदन केले.

उपस्थित मान्यवर ऍड अनिल जी नरवडेकर साहेब, माऊली देवस्थान कमिटी इन्सुली माजी अध्यक्ष श्री.कृष्णा सावंत, जेष्ठ दशावतार कलावंत श्री. श्याम निवेलकर, तंटामुक्ती अध्यक्ष इन्सुली श्री.सदानंद कोलगावकर माऊली देवस्थान कमिटी विद्यमान अध्यक्ष श्री.बमनोहर गावकर

श्री.नारायण राणे निगुडे सामाजिक कार्यकर्ते श्री.महेश धुरी माऊली देवी इन्सुली देवस्थान सर्व मानकरी श्री. परब,श्री. गावडे श्री. धुरी श्री. गावकर

इन्सुली वि. वि. कार्यकारी सोसायटी श्री. आनंद राणे हे मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडीतील अनेक सदस्य उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!