10.5 C
New York
Friday, November 8, 2024

Buy now

राजन तेलींच्या पाठपुराव्यामुळे आसोली भागात नेटवर्क गैरसोय दूर

वेंगुर्ला : माजी आमदार राजन तेली यांच्या पाठपुराव्यामुळे आसोली जोसोली व फणसखोल या भागासाठी दोन मोबाईल टॉवरवरून आता रेंज येत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती उपसरपंच संकेत धुरी यांनी दिली असून त्यांनी राजन तेली यांचे आभार मानले आहेत.

आसोली भागात दोन टॉवर आहेत. दोन्ही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला की बॅटरी बॅकअप नसल्याने गावातील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते. नेटवर्क मिळत नसल्याने ग्रामस्थ आसोली ग्रामपंचायत कडे तक्रारी करत होते. याबाबत ग्रामपंचायतीने बीएसएनएल कार्यालयाला पत्र देऊनही ते दुर्लक्ष करत होते. त्यामुळे उपसरपंच धुरी यांनी याबाबत माजी आमदार राजन तेली यांना कळविले. तेली यांनी तात्काळ याचा पाठपुरावा करून काम करून घेतल्याने आता आसोली गावात बीएसएनएलचे नेटवर्क मिळत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!