मानवी मनोरे रचण्याचा थरार याची देही याची डोळा पाहण्याची मिळणार कणकवलीत संधी
मानवी मनोरे रचण्याचे यांचे वर्ल्ड रेकॉर्ड केलेले जय जवान हे मुंबईतील नामांकित गोविंदा पथक
कणकवली : भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित असलेले “जय जवान गोविंदा पथक” सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४०० गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी स्पर्धेत मानवी मनोरे रचण्याचा थरार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ४३.१७ फूट उंचा पर्यंत मानवी मनोरे रचून विश्वविक्रम केलेला आहे. अशा या गोविंदा पथकाच्या आगमनामुळे सिंधुदुर्गवासीयांची उत्सुकता वाढली आहे. या पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानवी मनोरे म्हणजेच थरावर थर रचले जाणार आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार आहे. त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद आणि इतर अभिनेते आणि नेते उपस्थित राहणार आहेत.